‘विनाअनुदानित’चा संघर्ष हा केवळ विनाअनुदानित शिक्षकांचा संघर्ष नसून व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या माणसांचा संघर्ष आहे!
व्यवस्थेतल्या निर्ढावलेल्या, स्वार्थी आणि असंवेदनशील माणसांच्या मनात जरब आणि धाक निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही. म्हणून ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी; या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी. दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा; विविध घटकांतून, क्षेत्रांतून एक सकारात्मक संवाद घडावा.......